June 5, 2026
अकोला खामगाव बातम्या

ट्रक व कारचा अपघात; 4 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी…

खामगांव : खामगांव-अकोला रोडवरिल कोलोरी गावाजवळ गव्हाण फाट्याजवळ कंटेनरच्या धडकेत कारमधील 4 जण जागीच ठार तर 1जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. अपघातग्रस्त कार अकोल्याकडे तर कंटेनर खामगावकडे येत होता. जखमीला उपचारासाठी खामगावात आणण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार क्रमांक एमएच-२७, एआर-३६३२ अकोल्याकडे जात होती. त्याचवेळी खामगावकडे भरधाव येणाऱ्या कंटेनर क्रमांक आरजे-१८ जीबी-२५८९ या वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामध्ये कारमधील चौघे जागीच ठार झाले. तर एक गंभीर जखमी आहे. मृतकांमध्ये अकोल्यातील शिवनगर भागातील विनोद शंकरराव बावणे वय-५०, पप्पू मनोहर जोशी वय-४५, अतुल शंकरराव व्यवहारे वय-४७, राहुल सातळे-४० यांचा समावेश आहे.अपघातग्रस्त कारचालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शियांनी सांगितले. अपघात एवढा भीषण होता की कारमधील मृतदेह गॅसकटरच्या साह्याने पत्रे कापून बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे हेकॉ. खर्चे, जावेद शेख, गवई, खोले यांनी घटनास्थळावर धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले.

Related posts

केंद्र सरकारची हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही -माजी आमदार सानंदा

nirbhid swarajya

ई-पासपोर्ट तयार करण्यासाठी डिजी-लॉकरची लिंकही देता येणार

nirbhid swarajya

सरपंच उन्हाळे यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

nirbhid swarajya
error: Content is protected !!