November 21, 2025
बातम्या महाराष्ट्र शिक्षण

उद्या जाहीर होणार 12 वी चा निकाल

कोण मारणार बाजी मुले की मुली ?


मुंबई : अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून HSC म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १६ जुलै २०२०रोजी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळ अर्थात बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहेत.बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्याच धर्तीवर बारावीच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली. आता दहावीच्या निकालांकडे विद्यार्थी आणि पालक वर्गाचं लक्ष लागले आहे.विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खालील संकेतस्ळांना भेट द्यावी असे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
www.mahresult.nic.in
www.maharashtraeducation.com 
www.hscresult.mkcl.org

Related posts

सैनिकांसाठी प्रॉपर्टी संदर्भात विनामूल्य सेवा

nirbhid swarajya

सैनिक बांधवांसाठी मोफत प्रॉपर्टी सेवा

nirbhid swarajya

ज्ञानगंगा प्रकल्प 100 टक्के भरला; 36 गावांना सतर्कतेचा इशारा

nirbhid swarajya
error: Content is protected !!