January 1, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा

प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये – आमदार ॲड. आकाश फुंडकर

खामगांव : वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, पोलीस प्रशासन, सफाई कर्मचारीया कोरोना योध्यांच्या मागील ३ महिन्यांच्या अथक परिश्रमावर पाणी फेरु नये !  बुलढाणा जिल्हा कोरणाचा हॉटस्पॉट बनत चालला असतांनाही प्रशासन हे नागरिकांची जीवाची पर्वा न करता अक्षम्यचुका करीत असून नागरीकांच्या  जीवाशी खेळतआहे. जिल्हयातील तपासणीसाठी पाठविण्यातआलेले १०० च्यावर स्वॅब नमुने खराब झाले असून त्यांचे नमुने पुन्हा घ्यावे लागणार आहेत.त्यामुळे कोरोना संशयीतांमध्ये त्यांच्या कुटूंबांमध्ये व संपर्कातील नागरीकांमध्ये प्रचंड तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  अशातच कदमापूर आणि पळशी येथील 21 जणांचे तपासणीअहवाल ६ दिवस उलटूनही न मिळाल्यामुळे कुटूंबीय प्रचंड तनावात आले त्यामुळे हया संशयीतांमध्ये लहान मुल असल्यामुळे त्यांनी कालपासून प्रशासनाबददल रोष व्यक्त केलात्यामुळे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून प्रशासनाने हया लोकांच्या रॅपीडटेस्ट करुन त्यांना सुटी  देण्याचा अत्यंतबेजबाबदारपणाचा व कोरोना संकट वाढीची शक्यता निर्माण करणारा असा निर्णय घेतला असून हा निर्णय घेणा-या अधिका-यावर तसेच हयाआपात काल परिस्थितीत एक एक क्षण महत्वाचा असतांना मागील २२ दिवसापासून मंजूर असूनहीस्वॅब टेस्टींग मशीन आपल्या हेकेखोरपणामुळे खरेदी न करणा-या जिल्हा शल्य चिकीत्सकांवर तात्काळ कारवाई करुन स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्यात येऊन ती तात्काळ सामान्य रुग्णालय खामगांव येथे कार्यान्वीत करावी व प्रशासनाने नागरीकांच्या जिवाशी चालवलेला खेळ तात्काळ बंद करावा अशी मागणी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केली आहे. ‍दि. १जुलै २०२० रोजी खामगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांचा बेजबाबदार पणा चव्हाटयावर आणला. हया पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासन स्वॅब टेस्टींग मशीन खरेदीस अक्षम्य दिरंगाई करीत असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते, यासोबतच स्वॅब टेस्टींगनमुने जिल्हयाबाहेर अकोला, यवतमाळ येथे जात असून हया ठिकाणी पोहचे पर्यंत ते खराबहोण्याची शक्यता देखील आमदार आकाश फुंडकर यांनी हया पत्रकार परिषदेत वर्तवली होती. परंतु हया आपातकाल परिस्थितीत एक एक क्षण महत्वाचा असतांना जिल्हा प्रशासन वेळकाढू पणा करीत आहे. वैद्यकीय सामुग्री, उपकरणे खरेदी करण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये यासाठी कोव्हीड १९ काळात जिल्हा स्तरीय समितीला विशेष अधिकार प्रदान केले आहे. परंतु अशा ही परिस्थितीत जिल्हा प्रशासन नियमांची पुंगी वाजवण्यात व्यस्त आहे.   हे सर्व जीवघेण असून नागरीकांच्या हाल अपेष्टांशी प्रशासनाला काही सोयर सुतक नाही. कदमापूर येथील लहान मुलाच्या आई वडीलांच्या काल भावना अनावर होऊन त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनालाव्यथा मांडली व मुलांना घरी आणण्यासाठी त्या मातेने टाहो फोडला असे असतांना जिल्हाप्रशासन आपल्याच मग्रुरीत राहून स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्याबाबत कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही व त्या मुलांचे ६ दिवस उलटूनही स्वॅब नमुनयाचे रिपोर्ट आले नाही.  जिल्हयातील १०० च्या वर स्वॅबनमुने खराब झाले असल्याचे समोर आल्यामुळे त्या मातेच्या मनावर प्रचंड ताण आला व प्रशासनाला जाब विचारायला निघालेल्या त्या २१ कोरोंटाईनचे स्वॅब नमुने पाठवून रिपोर्टची वाट पाहण्यापेक्षा प्रशासनाने प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्यांची रॅपीडटेस्ट करुन त्या आधारावर त्यांना सुटी देऊन केवळ खामगांव तालुक्यातच नव्हे जिल्हाभरातीलकोरोनाचे संकट वाढविले आहे. हे सर्व प्रकरण गंभीर असून नागरीकांच्या जीवाशी खेळ करणारेआहे कारण रॅपीड टेस्ट हे कोरोना संशयीतांना सुटी देण्यासाठी प्रबळ कारण नाही. त्यामुळे हे १०० ते १२५ स्वॅब नमुने खराब झाल्याबददल व मागील २० दिवसापासून स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्ययात अक्षम्यदिरंगाई करणा-या जिल्हा शल्य चिकीत्सकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व आपाल परिस्थितीपाहता स्वॅब टेस्टींग मशीन खरेदी करण्यात येऊन ती तात्काळ विनाविलंब खामगांव येथेकार्यान्वीत करण्यात यावी.  अन्यथा येत्याकाळात कोरोना संदर्भात उदभवणा-या परिस्थितीस जिल्हा प्रशासन सर्वस्वी जबाबदारराहील असूनही वेळ गेलेली नाही. नागरीकांच्या जिवाचा विचार करावा दिवसरात्र झटणा-या आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, पोलीस अधिकारी, सफाई कामगार, न.प. प्रशासन हया कोरोना योध्दयांच्या  मागील ३ महिन्या पासूनच्या मेहनतीवर आपल्या गलथान कारभाराने हयावर पाणी फेरु नये अशीही मागणी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी केली आहे.                                             

Related posts

शा.तं.नि माजी-विद्यार्थी संघातर्फे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहाय्यता निधी करीता मदत

nirbhid swarajya

किराणा दुकान फोडून मुद्देमाल लंपास

nirbhid swarajya

अकोल्यातील ‘पूर’ : भू माफिया, भ्रष्ट राजकारणी आणि किडलेल्या व्यवस्थेचा ‘चिखल’

nirbhid swarajya
error: Content is protected !!