July 23, 2026
आरोग्य खामगाव

खामगाव येथे समर्थ नगरात आढळली पॉझिटीव्ह महिला

खामगाव : येथील समर्थ नगरचे बाजूला असलेल्या रमाबाई आंबेडकर चौक भागात २१ जून रोजी 45 वर्षीय महिला सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील समर्थ नगरचे बाजूला असलेल्या रमाबाई आंबेडकर चौक भागातील 45 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तिचा स्वेब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान 21 जून रोजी स्वेब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यामुळे रात्री ८ सुमारास येथील आरोग्य यंत्रणा दाखल होऊन फायर ब्रिगेडच्या वाहनाने परिसरात हायपोक्लोराइड मारून परिसर निर्जंतुकीकरण केला, त्यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांचे सह नगर परिषद कर्मचारी परिसरात दाखल झाले होते दरम्यान सदर महिलेस रुग्णवाहिकेत द्वारा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले संपर्कातील आणि जणांना क्वारंटाईन  करण्यात आले आहे.

ReplyForward

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 84 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 21 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

नगर परिषद खामगाव चे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमकडे दुर्लक्ष

nirbhid swarajya

स्विफ्ट कार ची दुचाकीला जोरदार धडक दुचाकीस्वार जागीच ठार

nirbhid swarajya
error: Content is protected !!