September 5, 2026
आरोग्य जिल्हा बातम्या

जिल्ह्यात आज प्राप्त 120 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 12 पॉझिटिव्ह

4 रूग्णांनी केली कोरोनावर मात

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 132 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 120 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे भीमनगर, मलकापूर येथील 16 व 20 वर्षीय तरूणी, 9 वर्षीय मुलगा, 30 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहेत. तसेच पारपेठ, मलकापूर येथील 43 वर्षीय पुरूष, 59 वर्षीय पुरूष, हेडगेवार नगर, मलकापूर येथील 36 वर्षीय पुरूष, धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध महिला, 62 वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचे आहेत. त्याचप्रमाणे हनुमान चौक, मलकापूर येथील 8 महिन्याचे बाळ व 27 वर्षीय महिला पॉझीटीव्ह आली आहे. तसेच ब्राम्हणचिकना ता. लोणार येथील 30 वर्षीय पुरूषाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे 12 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.      

त्याचप्रमाणे आज चार रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये शेलापूर, ता. मोताळा येथील 50 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष, मच्छी ले आऊट, बुलडाणा येथील 36 वर्षीय पुरूष व भीमनगर, मलकापूर येथील 25 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत 81 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 81 आहे.  सध्या रूग्णालयात 44 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.  तसेच आतापर्यंत 1872 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 130 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे.   तसेच आज 15 जुन रोजी 132 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 12 पॉझीटीव्ह, तर 120 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  18 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1872 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 52 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 02 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

काळ्याबाजारात जाणारा रेशन तांदुळ पकडला

nirbhid swarajya

भाजपच्या वतीने भारतरत्न अटलजींना अभिवादन करून सुशासनदिन साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!