July 21, 2026
आरोग्य जिल्हा

प्राप्त 38 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 08 पॉझिटिव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 46 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 38 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल काल रात्री व आज सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव आलेल्या अहवालांमध्ये 4 महिला व 4 पुरूष आहेत. तसेच या अहवालांमध्ये मलकापूर येथील 4, धरणगांव ता. मलकापूर येथील एक, शेलापूर खुर्द ता. मोताळा येथील दोन व साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा येथील एक आहे. मलकापूर येथील बाधीत व्यक्तींचे वय 29, 21, 45 वर्षीय दोन व एक 72 वर्षीय वृद्ध आहे. तसेच शेलापूर येथील बाधीतांमध्ये 26 वर्ष व 3 वर्ष वय आहे. साखरखेर्डा येथील कोरोनाबाधीत रूग्णाचे वय 55 आहे.
आतापर्यंत 1274 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 67 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 33 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 33 आहे. सध्या रूग्णालयात 31 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 1 जुन रोजी 46 अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 14 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1274 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार : फडणवीस

nirbhid swarajya

संभाजी ब्रिगेड नांदुरा तर्फे रक्तदान शिबिर

nirbhid swarajya

शिष्यवृत्ती परीक्षेत डिझायर कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी राज्यस्तरावर…

nirbhid swarajya
error: Content is protected !!