December 28, 2024
खामगाव

लॉकडाऊन मध्ये वीज ही लॉकडाऊन!

खामगाव : कोरोनाला रोकण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन असतांना खामगाव परिसरातील वीजही लॉकडाऊन झाल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. मे महिना सुरू असल्याने प्रचंड उकाडा जाणवत असताना  विजेचा पुन्हा लपंडाव सुरू झाला आहे. 
आज दिनांक २९ मे रोजी कुठलीही पूर्वसूचना न देता शहरातील उदासी बाबा ले आउट, सावजी ले आउट, अनिकट रोड, सुटाळा खुर्द या भागातील या भागातील विजपुरवठा ५ ते ६ तास खंडित होता. विशेष म्हणजे महावितरण कंपनीकडून बीलांवर ग्राहकांचे नंबर नोंदवून घेऊन ही  त्यांच्या मोबाईल वर वीजपुरवठा बाबत व महावितरणाच्या इतर माहितीबाबत एसएमएस केल्या जात नाही व महावितरण चे सहाय्यक अभियंता मुस्तफा बोहरा यांना नागरिकांनी फोन केले असता त्यांना उडवाउडवची उत्तरे देण्यात तसेच कर्मचाऱ्यांना फोन केले तर त्यांचे फोन बंद असतात. लॉक डाऊन मुळे नागरिक जास्तीत जास्त वेळ घरात थांबत आहेत त्यामुळे वीज पाणी इंटरनेटचा वापर वाढला आहे या सुविधा नागरिकांना तत्परतेने मिळाव्यात अशा सूचना प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहेत मात्र या सूचनांची वीज वितरण कंपनीकडून अंमलबजावणी होताना दिसत नाही. निदान आपत्तीजनक स्थितीत असतांना तरी वीज वितरण कंपनीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच वीजवितरण  कंपनी मान्सून पूर्वीची कामे देखील पावसाळा जवळ आल्यावर सुरू करीत आहे अश्याप्रकारच्या वीज वितरणाच्या नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या या निष्काळजी कारभारामुळे विजेच्या समस्या कमी न होता त्यात वाढच होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

Related posts

अवैध रेती वाहतूक करणारे २ वाहने पकडली

nirbhid swarajya

शहरात चौकाचौकात मोकाट जनावरांचा हैदोस

nirbhid swarajya

भाजप महिला आघाडी अध्यक्षा चित्राताई वाघ यांच खामगावात जल्लोषात स्वागत…

nirbhid swarajya
error: Content is protected !!