July 22, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त १० कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त १० रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ६७३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २६ रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी एक मृत आहे. आतापर्यंत २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे.  सध्या रूग्णालयात दोन कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत आहे.    तसेच आज १५ मे रोजी १० अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व १० अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ५४ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

जळगावच्या रुग्णाला टाळ्या वाजवून दिला डिस्चार्ज..

nirbhid swarajya

कोरोनाचा वाढत प्रदूर्भाव लक्षात घेता या वर्षीचीही यात्रा रद्द…

nirbhid swarajya

कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या शहरात पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

nirbhid swarajya
error: Content is protected !!