September 10, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त १२ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त १२ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ६४६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २५ रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी एक मृत आहे. आतापर्यंत २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे.  सध्या रूग्णालयात एक कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत आहे.    तसेच आज १३ मे रोजी १२ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व १२ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने २७ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६४६ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

घाटपुरी जवळ ट्रॅव्हल्स पलटी; दोन जण जखमी

nirbhid swarajya

अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 445 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 81 पॉझिटिव्ह”

nirbhid swarajya
error: Content is protected !!