July 22, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ०९ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त ०९ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ६३४ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २५ रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  आतापर्यंत २३ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २३ आहे.  सध्या रूग्णालयात एक कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत आहे. सदर रूग्ण जळगांव जामोद येथील ४५ वर्षीय पुरूष आहे.    तसेच आज १२ मे रोजी ०९ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ०९ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ३२ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६३४ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.


सौजन्य – जिमाका

Related posts

आसलगावचे सुपुत्र राहूल मुळे यांना कर्तव्यावर असतांना आले विरमरण….

nirbhid swarajya

काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधातील आंदोलनाच्या समर्थनार्थ तहसीलदार यांना निवेदन

nirbhid swarajya

कोरोना लसीकरणाच्या जनजागृती साठी शिक्षक झाले नवनाथ

nirbhid swarajya
error: Content is protected !!