July 21, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त १८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त १८ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ६१५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत २० कोरोनाबाधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २० असून सध्या रूग्णालयात ३ रूग्ण उपचार घेत आहेत.   तसेच आज ९ मे रोजी १८ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व १८ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ०९ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ३ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६१५ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

भाजपा उमेदवाराचे प्रचारार्थ व नियोजनार्थ आ.फुंडकर पश्चिम बंगाल रवाना

nirbhid swarajya

विवाह सेवा संघर्ष समितीच्या वतीने एक दिवस धरणे आंदोलन

nirbhid swarajya

धक्कादायक,कोरोनामुळे डोणगाव पोलीस स्टेशन सील,कामकाज मेहकर कडे दिले

nirbhid swarajya
error: Content is protected !!