July 21, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ०८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त ०८ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ५९७  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत २० कोरोनाबाधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २० असून सध्या रूग्णालयात ३ रूग्ण उपचार घेत आहेत.
   तसेच आज ८ मे रोजी ०८ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ०८ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने २४ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ३ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५९७ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

चिखली अर्बन कडून शेतकऱ्याना ट्रॅक्टर वाटप

nirbhid swarajya

शहरातील रस्त्यांवर अंधारयात्रा; पथदिवे बंदच

nirbhid swarajya

महाजन कुटुंबातील आठ सदस्य कोरोनाच्या लढाईत

nirbhid swarajya
error: Content is protected !!