July 22, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त ५ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त ०५ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ५८९ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत २० कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २० असून सध्या रूग्णालयात ३ रूग्ण उपचार घेत आहेत.
   तसेच आज ७ मे रोजी ०५ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ०५ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने २२ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ३ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५८९ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

शॉक लागून ५५ वर्षीय इसमाचा मृत्यु

nirbhid swarajya

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या रथयात्रेचे खामगावात स्वागत

nirbhid swarajya

जुगारावर छापा ; सव्वा लाखाचा उद्देमाल जप्त

nirbhid swarajya
error: Content is protected !!