July 22, 2026
आरोग्य जिल्हा

जिल्हयात आज प्राप्त २९ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त २९ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ५८४ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४ रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी एक मृत आहे. तसेच आतापर्यंत २० कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २० असून सध्या रूग्णालयात ३ रूग्ण उपचार घेत आहेत.
तसेच आज ६ मे रोजी २९ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व २९ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने १३ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ३ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५८४ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

महाराष्ट्रात ही चीन प्रमाणे युद्धपातळीवर उभारणार कोविड – १९ हॉस्पिटल

nirbhid swarajya

मालमत्ता व इतर करांचा घोळ दूर करून द्या

nirbhid swarajya

प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!