October 20, 2026
शेगांव

विशेष पोलीस महानिरीक्षक यांची जलंब पोस्टे ला भेट

शेगांव : शेगांव तालुक्यातील जलंब येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले मृतक पोकॉ उमेश शिरसाठ यांना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टीप्पर चालकाने टीप्पर अंगावर टाकून ठार केल्याच्या घटनेने त्या घडलेल्या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा एकच खळबळ उडाली होती तर  या गंभीर घटनेची दखल घेऊन सखोल चौकशी करण्याकरिता अमरावती येथील विशेष पोलिस निरीक्षक रानडे यांनी ३ मे रोजी दुपारी बारा वाजता जलंब येथील पोलीस स्टेशनला भेट दिली. सर्वप्रथम ज्या ठिकाणी अवैध रेती वाहतूक करणार्‍या टिप्पर चालकाने टिप्पर अंगावर टाकून पोकॉ सिरसाठ यांना ठार केले त्या माटरगाव रोड वरील घटना स्थळावर विशेष पोलीस महानिरीक्षक रानडे यांनी स्वतः जाऊन घडलेल्या घटनेची पाहणी केली त्यानंतर जलंब पोलीस स्टेशन मध्ये आले असता पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाठ यांचा मृत्यू कसा झाला याबाबत एस पी हेमराजसिंह राजपूत, डीवायएसपी प्रदीप पाटील, ठाणेदार पांडुरंग इंगळे, पी एस आय राहुल काकडे यांच्या उपस्थितीत पोकॉ मृतक उमेश शिरसाठ यांच्या झालेल्या मृत्यूबाबत गांभीर्याने लक्ष घालून सखोल चौकशी केली या घटनेबाबत यापुढे असले घडलेले प्रकार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा सुद्धा दिला असल्याचे समजते.

Related posts

मराठी प्राथामिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा मनमानी कारभार – शाळा भरते सकाळी ११ वाजता…

nirbhid swarajya

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे शनिवारी बुलढाणा जिल्हयात…

nirbhid swarajya

अतिक्रमणधारकाने पेट्रोल घेतले अंगावर प्रशासनाशी घातला वाद…

nirbhid swarajya
error: Content is protected !!