January 6, 2025
आरोग्य बुलडाणा

जिल्हयात आज प्राप्त ८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : जिल्ह्यात आज प्राप्त ८ रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत ३२८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २१ रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एक मृत आहे.  तसेच आतापर्यंत ११ कोरोनाबधीत रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ११ झाली असून सध्या रूग्णालयात ९ रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आज २४ एप्रिल रोजी ८ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व ८ अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ४ आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण ९ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ३२८ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

सौजन्य : (जिमाका) 

Related posts

महाजन कुटुंबातील आठ सदस्य कोरोनाच्या लढाईत

nirbhid swarajya

बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या आमदार संतोष बांगरांवर कठोर कारवाई करा-अशोक सोनोने

nirbhid swarajya

अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक

nirbhid swarajya
error: Content is protected !!