April 19, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशिष्ट समाजाच्या युवकास पकडले

स्थानिकांनी दिला युवकास चोप; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

खामगांव : शहरातील फाटकपुरा भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असताना एका विशिष्ट समाजाच्या युवकाला स्थानिक नागरिकांनी पकडले चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील केला हिंदी हायस्कूल जवळील एका टपरी मागे एका विशिष्ट समाजाच्या युवक अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करत असताना परिसरातील स्थानिक नागरिकांनी पकडून त्याला चांगला चोप दिला. त्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. तात्काळ या घटनेची माहिती नागरिकांनी शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच खामगाव शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते व तेथून सदर युवक व युवती ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणले. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या जबाबावरून अत्याचार करणाऱ्या आरोपी इमरान खान मेहमूद खान वय २५ रा.मस्तान चौकविरुद्ध कलम ३५४ ड, ३७६,५०४ भादवी ६ कलम ४, ८ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या युवकाचे लग्न झालेले असून त्याची पत्नी त्याला सोडून गेली असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय निलेश सरदार हे करीत आहेत.

Related posts

गुटखा प्रकरणात जामीन मिळू नये- ना. डॉ. शिंगणे

nirbhid swarajya

अनधिकृतपणे‌ लिंबाचेझाड तोडणाऱ्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

nirbhid swarajya

राम मिश्रा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

nirbhid swarajya
error: Content is protected !!