July 22, 2026
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई सामाजिक

श्रमिक हमाल मापारी कामगार संघटनेने केले मृत कामगार व्यक्तींच्या कुटुंबास आर्थिक मदत

खामगांव : कृषी उत्पन्न बाजार समिती मधे असलेला लक्ष्मण बेनी सावरकर कामगार अचानक मृत्यु पावल्याने माजी संचालक राजेश हेलोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट मधील सर्व कामगार बंधू यांच्या प्रयत्नाने आर्थिक मदत देण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामगार म्हणून काम करणारे लक्ष्मण सावरकर यांची बऱ्याच दिवसांपासून तब्येत खराब असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे. घरातील एकुलते एक कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले होते. हे आर्थिक संकट लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेश हेलोडे व मित्र मंडळ तसेच बाजार समितीमधील व्यापारी, अडते यांनी त्याच्या कुटुंबास १७५०० रु.ची आर्थिक मदत केली आहे.

विशेषता मार्केट मधील अडते गणेश प्रल्हादराव देवकर यांनी या कामगार बांधवास पाच हजार रूपयांची आर्थिक मदत केली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेश हेलोडे, दगडु सरदार,नथ्थुजी मोरे,बबन घोडेचोर,बब्बुभाई पहेलवान, सुनिल लांडगे,पिंटु नितनवरे, महादेव सावरकर,शे.अहमद, गंगाराम मकेकर, राहुल सावंग,राजु सावरकर, कैलास लालमन, गणेश बेनीवाल, नागो हेलोडे,गजु इंगळे, किशोर हेलोडे, शे.शगीर, शंकर सावरकर,छगन गुजरीवाले,अजय हेलोडे, सुरेश पारवे,प्रल्हाद जाधव,संजु सावरकर, दादाराव धुंदळे, गौतम हेलोडे, हरि पाटील, नरहरी चौधारे, बापू खोसे,व समस्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामगार बंधू उपस्थित होते.

Related posts

सुटाळा बु ग्रामपंचायतची दिवाळी निमित्य आशा सेविकांना अनोखी भेट

nirbhid swarajya

दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या; एक जण जागीच ठार, दोन गंभीर….

nirbhid swarajya

डॉ. आशिष अग्रवाल यांनी केली कंपाउंडर ला मारहाण; गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!