July 22, 2026
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

बुलडाण्यात ऑक्सिजन जनरेश प्लांट कार्यान्वित

बुलडाणा : कोरोनाने हैराण केले असतांना ऑक्सिजन तुटवड्यावर निदान म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लांट पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात येत आहेत. आज १५ मे रोजी बुलडाणा स्त्री रुग्णालय समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्याला दररोज जवळपास १६ मे.टन ऑक्सिजन लागतो. आता या प्लांट व्दारे ८० जम्बो सिलींडर हवेतील ऑक्सिजन २४ तासात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता, थेट प्लांटपासून रुग्णांच्या बेडला ऑक्सिजन पाइपलाईन अटॅच करुन रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येईल. देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी प्लांट लवकरच उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या कोरोना लाटेच्या शक्यतेमुळे राज्य स्वंयपूर्ण होत असतांना बुलडाणा जिल्हा देखील सर्वार्थाने स्वंयपूर्ण करणार असल्याचा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.

Related posts

आज प्राप्त 33 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 06 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

सरपंच उन्हाळे यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

nirbhid swarajya

कर्तव्यदक्ष पोलिस दादांना घरपोच मोफत भाजीपाला!

nirbhid swarajya
error: Content is protected !!