भंगार व्यवसायिक इंगळे यांच्या दुकानावर राडा प्रकरण
खामगाव: स्थानिक आठवडी बाजार भागातील भंगार व्यावसायिक राजेंद्र इंगळे यांच्या दुकानावरील हल्ला प्रकरणातील आरोपी आनंद मोहन अहिर यांच्यासह ९ जणांचा अटक पूर्व अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे.२७ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत ४ जण गंभीर जखमी झाले होते. याबाबत राजेंद्र इंगळे यांच्या तक्रारीवरून तब्बल २३ जणांविरुद्ध विविध कलमान्वये खामगाव शहर पोस्टमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये शुभम धर्मेन्द्रसिंग ठाकूर, हितेश हरिदास लाटा यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली होती. यापैकी शुभम व हितेश यांनी जामीन अर्ज खामगाव न्यायालयात दाखल केला होता परंतु न्यायालयाने या दोघांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. तर आनंद मोहन अहिर,अक्षय आनंदमोहन अहिर,आदित्य आनंदमोहन अहिर, राम रामलाल अहिर, श्याम रामलाल अहिर,विक्की गणेश पारधी,राम मोहन अहिर,मंगेश सुरेश अतकरे, रघु विजू तिवारी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर न्यायाधीश श्रीमती वैरागडे यांनी सदर प्रकरणाचा तपास अपूर्ण असल्यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व व रेग्युलर जामीन देने योग्य नाही असे मत नोंदवून या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सरकार पक्षातफ्रे अँड.उदय आपटे व सहाय्यक म्हणून अँड. रोशन गोरले व अँड.शेखर जोशी यांनी काम पाहिले. सदर प्रकरणांमध्ये मारामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळे या प्रकरणाची सर्वच जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू होती. याची दखल घेत पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ गुन्हे दाखल केले होते. आता या आरोपींना जामीन अर्ज नामंजूर झाल्याने आरोपी भूमिगत झाले आहे.
