April 19, 2025
आरोग्य खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई

रस्त्यांवर विनाकारण फिरणार्‍यांसाठी प्रशासनाची अनोखी शक्कल

खामगांव : महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांना चोप बसवण्यासाठी पोलीस, आरोग्य यंत्रणानी नामी शक्कल लढवली आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांची खामगांव शहरात थेट कोविड टेस्ट करण्यात येत आहे.खामगांव शहर पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या गांधी बगिच्या मधे पोलिसांच्या माध्यमातून आरोग्य विभागाची धडक कारवाई सुरु आहे. अनावश्यक फिरणारा आढळल्यास त्यांची त्वरीत रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे.राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध व रात्रीची संचारबंदी व वीकेंड लॉकडाऊन लागू केलेला आहे. तरीही विनाकारण काही नागरिक बाहेर फिरतांना दिसतात. त्‍यांच्‍यावर अंकुश ठेवण्‍यासाठी खामगांव पोलिस, पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने एक अनोखी शक्कल लढवत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट अँटीजन टेस्ट करण्याची मोहिम सुरु केली आहे. मला काही होत नाही, कोरोना बिरोना काही नाही, किती भेतोस, काही होत नाही, असं म्हणणाऱ्यांची बरीच संख्या ठिकठिकाणी आहेच. या लोकांचा त्रास प्रशासनावर पडत असतो. अशा लोकांत अनेक वेळा लक्षणे नसणारी कोरोना बाधितही असू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग होवून कोरोना बाधितांची संख्या वाढते. अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी खामगांव पोलिस, आरोग्य व पालिका प्रशासनाने अनोखी शक्कल लढवली आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. खामगांवमध्ये विनाकारण फिरणाऱ्यावर स्थानिक प्रशासनाने विशेष मोहिम आखली आहे. नियमभंग करुन विनाकारण फिरणार्‍यां लोकांना खामगांव पोलिस, पालिका आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर पकडले. त्‍यांची थेट ऑन द स्पॉट त्यांची अँटीजन टेस्ट करण्‍यात येत आहे. कोरोना पॉझिटीव्‍ह आलेल्‍यांची रवानगी थेट कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येत आहे. यामध्ये एकूण १२५ जणांची कोरना एंटीजन टेस्ट करण्यात आली असून ६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. येवढेच नाही तर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अनोख्या कारवाईमुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होईल, असे मत उपविभागीय अधिकारी रविंद्र जाधव व तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना व्यक्त केले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी जाधव यांनी निर्भीड स्वराज्य शी बोलताना सांगितले की निर्भिड स्वराज्यच्या माध्यमातून लोकांना असे आवाहन करतो कि, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व विनाकारण घराबाहेर पडू नये.तसेच व्यापारी लोकांनी आपली कोरोना टेस्ट दर १५ दिवसांनी करून घ्यावी. तसेच आरोग्य विभागाकडून विविध ठिकाणी लस देण्याचे कॅम्प सुरू आहेत. ४५ वर्षावरील लोकांनी त्याचा फायदा घेत लस टोचून घ्यावी असे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी सांगितले तसेच एमआयडीसी मधील लेबर लोकांसाठी त्या भागात असलेल्या विश्रामगृहावर दररोज कोरोना टेस्टींग व लसीकरण सुरू असल्याचे सुद्धा तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना सांगितले.

Related posts

विनापरवाना दारू घेऊन जाणाऱ्या दोघां विरूध्द कारवाई

nirbhid swarajya

लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 339 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 75 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!