September 4, 2026
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा

अवैधरित्या दारूची वाहतूक करताना एकास अटक

खामगांव : अवैधरित्या दारूची वाहतूक करताना ऑटो सह एकाला अटक केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल धुलिवंदनाच्या दिवशी पोलिसांची बाळापूर नाका येथे वाहन तपासणी सुरू असताना एक ऑटो अवैधरीत्या दारू घेऊन जाताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी ऑटो क्रमांक MH-२८-T -३१६१ याची तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूचे 13 बॉक्स किं.३२६०० रु. बियर १ बॉक्स किं. १८०० रु., तसेच इंपिरियल ब्लू कंपनीची दारू ४८ बॉटल किंमत ७२०० रु. व ऑटो किंमत ५० हजार रुपये असा एकूण१०१६८० रुपयाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरचा माल एमआयडीसीमधील स्वस्तिक दारू दुकानांमधून घेऊन अटाळी व आवार कडे वाटप करण्यासाठी घेऊन जात असल्याचे ऑटो चालकाने सांगितले आहे. यावेळी ऑटो चालक प्रकाश ज्ञानदेव काळे रा. गोंधनापूर याला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई दारू कायद्यानुसार ६५ अ, ई महाराष्ट्र दारू कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास एपीआय निलेश सरदार हे करत आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 339 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 75 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

लॉकडाऊनमध्ये रांगोळीच्या माध्यमातून कोरोना विषाणूपासून बचावाबाबत जनजागृती

nirbhid swarajya

१६ वर्षापासून बुलढाणा अर्बनची सेवा अविरत

nirbhid swarajya
error: Content is protected !!