September 5, 2026
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

ट्रकला दुचाकीची मागून धडक ; एक ठार एक जखमी

खामगांव : एम आय डी सी भागातील बिरला कॉटसिन कंपनी जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दूसरा जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुटाळा बु येथील रहिवासी शुभम भोपळे वय २१ व अंकित अढाव वय २१ हे दोघे आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास दुचाकी क्र MH-२८-BH-३१२२ ने शेतात जात असताना चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने समोर उभ्या असणाऱ्या ट्रक क्र MH-४०-BL-५९५९ ला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील शुभम व अंकित हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्वरित नागरिकांनी दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता दोघांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आले. अकोला येथेउपचाराकरिता नेले असता यातील अंकित आढाव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर शुभम भोपळे गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Related posts

रविवारी खामगावात कुणबी समाज वधु – वर परिचय मेळावा

nirbhid swarajya

खामगांवचे आमदार कोरोना पॉजिटिव्ह ; स्वतः सोशल मीडिया वरून दिली माहिती

nirbhid swarajya

कंटेन्टमेंट झोनमध्ये दवाखाने व मेडीकल वगळता अन्य दुकाने बंद

nirbhid swarajya
error: Content is protected !!