खामगाव : माटरगांव येथील श्री गुरुदेव नवदुर्गा उत्सव मंडळ व श्री गुरुदेव सेवा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर माटरगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकिकडे सामाजिक भान विसरून उत्सवांना विचित्र स्वरूप देण्याकडे तरुणाईचा कल असतांना आचार्य वेरुळकर गुरुजी यांचे प्रभावामुळे श्री गुरुदेव नवदुर्गा उत्सव मंडळ नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात व दुर्गोत्सव शांततामय पद्धतीने साजरा करण्यात अग्रेसर असते. मंडळाच्या या वैचारिक परंपरेला अनुसरूनच यावर्षी रक्त पुरवठ्याची गरज पाहता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मा.धिरज मांडे ठाणेदार जलंब यांचे हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी महालक्ष्मी क्रुषी विद्यालयाचे मा.अनंतराव आळशी, दळवी गुरुजी, प्रशांत टिकार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोल देशमुख डॉक्टर असोसिएशन चे डॉ. गायकवाड डॉ. शुक्ला, डॉ. कडाळे,डॉ. अग्रवाल, डॉ. खान,डॉ. गावंडे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कुळकर्णी ,इंदिरा पतसंस्थेच्या व्यवस्थापक सौ.गीतांजली देशमुख, मारोती घुले हे होते. याशिबिरामध्ये महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. रक्तदानाबदल ग्रामीण महिलांमध्ये सुद्धा जाग्रुती होते आहे हे विशेषत्वाने जाणवले. रक्तसंकलनासाठि डॉ. बी पी.ठाकरे ब्लड बँक अकोला येथील चमू डॉ.तोष्णीवाल सर,संतोष सुलताने,साहिल वाघमारे, सिस्टर रजनी ताई ,दत्ता पाटील हे आले होते.शिबिराचे आयोजनासाठी बंटी देशमुख, राम देशमुख, भूषण ठाकरे, प्रदिप देशमुख, शुभम डांगे, शुभम मिरगे, निलेश देशमुख, शिवशंकर बाभूळकर,अक्षय देशमुख, संजय मुरे,संतोष धोटे, सुधीर धनोकार,पवन बिनोरकर,मयूर मिरगे,राम देशमुख, प्रतिक तांदूळकार,सुरेशराव देशमुख,विलासराव देशमुख,मंगेश देशमुख सर,गोपाल धोटे,प्रतिक धनोकार, डॉ. मिथीलेश देशमुख, गौरव भांबेरे,मयूर देशमुख.यांनी परीश्रम घेतले.या रक्तदान शिबीर व श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सातत्यपूर्ण सामाजिक ,आध्यात्मिक व पर्यावरण विषयक कामाचे कौतुक उपस्थितांनी केले.या शिबिरात रक्तदात्यांचा प्रतिसाद उल्लेखनीय होता.
previous post