अमरावती : महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली मात्र काहीच शेतकऱ्यांना अमरावती विभागात याचा लाभ झाला, तर काही शेतकऱ्यांचा कर्जमाफी संदर्भात गोंधळ झाला असा गंभीर आरोप माजी कृषी मंत्री अनिल बॉंडे यांनी केला आहे.
अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम,बुलडाणा,अकोला या जिल्ह्यातील ६,२५,२२६ शेतकऱ्यांचे आधार अपलोड झालीत तर २,८२,९७७ शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिक झालीत तर अमरावती जिल्हात मोजक्या काहीच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. २२ मे रोजी राज्यसरकारने शासन आदेश काढून राज्याची स्थिती कर्ज वाटप करण्याचे त्यांनी सांगितले मात्र आता खरिप हंगामासाठी ३ टक्के शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जपुरवठा झाला नाही तर शेतकरी सावकाराकडे जाऊ शकतो, अशी भीती माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी वर्तविली आहे.
previous post