शेगाव: येथील नगर परिषद प्रवेशद्वारावर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमांनी तोडफोड करुन दगडफेक केली. सकाळी अचानक इमारतीच्या आत प्रवेश करून शिवीगाळ करुन दगडफेक केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी दुपारी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.यावेळी नगर परिषद कर्मचारी यांनी शहर पोलिसात निवेदनात दिलेल्या नमूद आहे की, झालेल्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमधे भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ या हल्लेखोराना अटक करुन कारवाईची मागणी केली आहे.