खामगांव : आगामी येणाऱ्या गणेशोत्सव, मोहरम व इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक / जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6: 30 वाजता आईसाहेब मंगल कार्यालय येथे शांतता समितीची बैठकीचे आयोजन केले आहे. सदर बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ अॅड.आ आकाश फुंडकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तसेच शिवाजी नगर पो.स्टे.ठाणेदार सुनील हुड, ग्रामीण पो.स्टे.ठाणेदार रफिख शेख यांच्या उपस्थितीत होणार आहे.या बैठकीला सर्व मंडळाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक ,पत्रकार ,शांतता समितीचे सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले आहे.
previous post