खामगांव : महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले संजय पहुरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांचा मुलगा आयुष याने भोजन वाटप करुन साजरा केला. संजय पहुरकर यांचा २६ मे रोजी वाढदिवस होता, आणि वाढदिवस योगा योगाने हा बौध्द पोर्णिमेच्या दिवशी आल्याने खुपच सुदंर योग झाला होता. या पावन दिवशी संजय पहुरकर यांच्या मनात भोजनदान देण्याची ईच्छा होती व ती ईच्छा त्यांनी परिवारा समोर प्रकट केली. परंतु त्यातच कोरोना महामारी असल्यामुळे ते करणे अशक्यच वाटत होते. त्यातच पोलीस विभागात असल्यामुळे रात्र पाळीची चेकींग ड्युटी असल्यामुळे हे शक्य होइल का असा प्रश्न पडला होता. वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर संजय पहुरकर हे आपली नाईट ड्यूटी करुन घरी आले होते. वाढदिवसाच्या दिवशी अचानक एक व्हिडीओ क्लीप त्यांच्या मोबाईल वर झळकली. त्यांनी व्हिडियो क्लिप पाहिली तर त्यामधे त्यांचा मुलगा आयुष याने सामान्य रुग्णालय खामगांव येथे लॉयन्स कल्ब च्या माध्यमातुन स्वत:च्या पॉकेट मनीतुन २०० रुग्णांचे नातेवाईकांना भोजन दान करताना दिसला. त्यानंतर सायंकाळी सामान्य रुग्णालयात ,रेल्वे स्टेशन, बस स्टैंड, संकट मोचन हनुमान मंदिर आदि ठिकाणी संजय पहुरकर यांच्या हस्ते ५० गरजुना भोजन वाटप करण्यात आले. आपल्या मुलाने वाढदिवसाचे दिवशी आपली मनातील ईच्छा पुर्ण केली तेव्हा त्यांचे मन प्रसन्न झाल असे त्यांनी सांगितल. यावेळी डीडीआर दीपक जाधव, एपीआय सुहास राऊत, प्रमोद तायस, जेष्ठ पत्रकार राहुल पहुरकर,अँड. राहुल पहुरकर, श्रीधर ढगे, अमोल गावंडे, कुणाल देशपांडे, शिवाजी भोसले,नापोका मिलिंद जवंजाळ,धम्मा नितनवरे, आयुष पहुरकर, हर्ष पहुरकर, आदित्य पहुरकर, शुभम गवई, संकेत गवई, अजय खरात, शुभम कीर्तपुढे, रत्नदीप सुरवडे, शुभम कवठेकर आदी उपस्थित होते.
previous post