खामगांव : कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामध्ये सर्वत्र संचारबंदी असतांना खामगांव येथे अवैधरित्या सऱ्हास दारूची विक्री सुरु आहे. पोलीस प्रशासन सुध्दा यावर नियंत्रण मिळवण्याकरिता प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर खामगाव शहरातील टिळक पुतळा जवळील गुप्ता यांच्या मोहफुलांची विक्री करणाऱ्या गोडाऊन वर पोलिसांनी छापा मारून १६ लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त करून गोडाऊन मालकासह ५ जणांनावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे खामगांव येथील ब्रीजमोहन होशीयार गुप्ता (७२) विपीन सुरेशचंद्र गुप्ता (५२) दोघे रा. टिळक पुतळ्याजवळ हे आज सकाळी त्यांच्या घराजवळील गोडाऊनमधून छुप्या पध्दतीने मोहफुलांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती शहर पोस्टेचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांना मिळाली. यावेळी ठाणेदार अंबुलकर यांनी त्यांच्या पथकासह छापा मारुन ब्रिजमोहन गुप्ता व विपीन गुप्ता यांना रंगेहाथ पकडून गोडावूनमधून ४६८ पोते मोहफुलांसह अंदाजे 16 लाख 24 हजार रु मुद्देमाल जप्त केला आहे.
previous post
next post