November 20, 2025
अकोला

माजी आमदार शिरस्कार व भदे यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

मुंबई : बुलडाणा वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा देत बाहेर पडलेले अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. बुधवारी मुंबईत सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही प्रवेश घेवून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीला विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मोठा धक्का बसणार हे निश्‍चित झाले होते. जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांनी ‘वंचित’ मधून बाहेर पडत राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्‍चित झाला होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दोघांचाही प्रवेश लांबल्याने त्यांच्या प्रवेशाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्ये त्यामुळे दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. वंचित बहुजन आघाडीनेही या दोघांच्या प्रवेशात अडचणी निर्माण करण्यात सुरुवात केली होती त्यामुळे कोरोना व निसर्ग वादळाच्या धोक्यातही अखेर बुधवारी प्रवेशाची अनिश्‍चितता संपवत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेले माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल तसेच त्यांनी बुलडाणा लोकसभा 2019 निवडणूक सुद्धा लढवली होती त्या मध्ये ते दुसऱ्या नंबर राहिले होते हे विशेष.  त्यांचे बुलडाणाकरांचे सुद्धा नाते आहे. मुंबईतील या राजकीय वादळाचा राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.  मुंबईत राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने या दोन्ही माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सोशल मीडियाचा माध्यमातून दिली. शरद पवार यांचे सिल्व्हर ओक या बंगल्यावरच हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पवार यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जंयतराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगणराव भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राहुल डोंगरे आदींची उपस्थिती होती.

Related posts

मानाच्या नऊ पालख्यांना पायदळ वरीला परवानगी द्यावी

nirbhid swarajya

वारी हनुमान प्रकल्पातुन 128. 30 घ. मी. से. विसर्ग, 6 वक्रद्वारे 50 से. मी. नी उघडले, नदीकाठच्या 14 गावांना सतर्कतेचा इशारा, 4 गावांच्या पुलावरून पाणी, परिसरातील गावांचा संपर्क तुटला.

nirbhid swarajya

अकोला शिवणी विमानतळाला जमीन अधिग्रहणासाठी निधी देण्याची केसरकरांची घोषणा…

nirbhid swarajya
error: Content is protected !!