३६२८२ नागरिकांची झाली तपासणी तर १०३६३ जणांच्या हातावर होम क्वारंटाईन चे शिक्के
बुलडाणा : कोरोना व्हायरस चे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आलाय आणि या रोगाचे पॉझिटिव्ह रुग्ण हे मोठ्या प्रमाणात शहरी भागात आढळल्याने ग्रामीण भागातून शहरी भागात गेलेले सर्व नागरिक आता परत आलेले आहेत त्यामुळे एकट्या बुलडाणा जिल्ह्यात परत आलेल्यांची संख्या ३८ हजारांपेक्षाही जास्त असल्याची शासकीय आकडेवारी समोर आली आहे.
संपूर्ण देश लॉक डाऊन झाल्यानंतर मुंबई , पुणे , नाशिक, औरंगाबाद सह इतर शहरात कामा च्या निमित्ताने गेलेले नागरिक कोरोनाच्या भीतीने पुन्हा आपल्या गावाकडे परत आले असून बुलडाणा जिल्ह्यात ३८ हजार ७७९ नागरिक परत आल्याची आकडेवारी जिल्हा परिषद विभागाला प्राप्त झाली आहे , यापैकी ३६ हजार २८२ नागरिकांची तपासणी केली असून, १० हजार ३६३ जणांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारलेले आहेत.