बुलडाणा:-जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या सौ. मनिषा नितीन पवार तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या सौ. कमलताई जालिंदर बुधवत यांचे अर्ज दाखल झाले होते, तर भाजपतर्फे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सौ. रुपाली अशोक काळपांडे व सौ. जयश्री विनोद टिकार असे दोन-दोन अर्ज दाखल केले होते.
मात्र भाजपाच्या दोन्ही उमेदवारांनी त्यांचे अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतल्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ. मनीषा नितीन पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ. कमलताई जालिंदर बुधवत यांची निवड अविरोध विजयी म्हणून जाहीर घोषित करण्यात आली आहे.
next post