मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
बुलडाणा : महाराष्ट्रामध्ये सध्य:स्थितीत कोविड 19 विषाणुमुळे अत्यंत गंभिर परिस्थिती आहे. अशा स्थितीमध्ये राज्य शासनाकडुन सर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवुन बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने एक दिवसाचे वेतन ४ लक्ष २६ हजार ७०० मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे दृष्टीने जमा केलेले आहे.सदर जमा केलेल्या एक दिवसाच्या वेतनाची रक्कम ४,२६,७००रूपयांचा धनादेश बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक खरात यांनी आज ९ एप्रिल २०२० रोजी विभागीय आयुक्त पियुष सिंग यांना सुपूर्द केला.