शेगाव: येथील बसस्थानकावर विद्यार्थिनीची छेड काढणान्या दोघांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील गायगाव बु.येथील १५ वर्षीय विद्यार्थिनी काल बसची वाट पाहत थांबली होती.यावेळी गौरव विजय गांवडे वय वर्षे १९ रा. शेगाव व प्रशिक आबाराव बोदडे वय वर्षे २९ रा. गौलखेड या दोघांनी सदर विद्यार्थिनीची छेड काढली.माहिती मिळताच सदर विद्यार्थिनीचा भाऊ तेथे आल्याने ते दोघे निघून गेले.
मात्र काही वेळणे या दोघांनी आणखी काही जणांना बोलावून त्या विद्यार्थिनीच्या भावाला मारहाण करून जखमी केले.याबाबत तिने पोस्टेला तक्रार दिली.त्यावरुन पोलिसांनी उपरोक्त दोघांविरुध्द कलम ३५४,३५४ (अ), ३२३, ३४ भादंवी सहकलम १२ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.