भारतीय टपाल खात्यात दहावी-बारावी उत्तीर्णांपासून पदवीधारकांसाठी विविध पदांवर भरती होत आहे. यात चालक, ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन या पदांचा समावेश आहे.चालकच्या १४ पदांसाठी नोकरभरती आहे. या पदांसाठी आवश्यक वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी १९,९०० रुपये प्रति महिना वेतन आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० मार्च २०२० आहे. क्रीडा कोट्यातून ज्युनिअर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमन पदांवर भरती होणार आहे. ही भरती टपाल खात्याच्या कर्नाटक क्षेत्रात निघाली आहे. पोस्टमन पदासाठी १२ वी उत्तीर्ण तर ज्युनिअर अकाउंटंट पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी आहे.
Attachments area