गेल्या काही महिन्यापासून चर्चेत असलेली भारत संचार निगम (बीएसएनएल) मधील स्वेच्छानिवृत्ती योजना अखेर प्रत्यक्षात उतरलेली दिसून येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील बीएसएनएल मधील 148 पैकी तब्बल 91 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती चा झटका देत घरी पाठविले आहे त्यामुळे आता जिल्ह्यात केवळ 48 कर्मचाऱ्यांवरच बीएसएनएलची जबाबदारी आहे. त्यातही लँडलाईनची सेवा दुरुस्त करण्यासाठी केवळ दोनच लाईनमन राहिले आहेत त्यामुळे ही सेवा आता सुरळीत कशी राहील असा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ लागला आहे? महानगर टेलिफोन निगम तसेच भारत संचार निगम या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांसाठी नोव्हेंबर 2019 मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर करण्यात आली होती .पन्नास वर्ष व त्यापेक्षा वय असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती या योजनेमुळे सेवेच्या प्रत्येक वर्षा पोटी 35 दिवसाचे वेतन आणि निवृत्त होईपर्यंत प्रत्येक वर्षा पोटी 25 दिवसाचे वेतन अशा रितीने एकत्रित रक्कम सहानुग्रह अनुदान म्हणून स्वेच्छा निवृत्त झालेल्या या कर्मचारी अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे जिल्ह्यातील भारत दूरसंचार लि( बीएसएनएल) मध्ये 148 कर्मचारी-अधिकारी होते. बीएसएनएलचे कार्यालय तालुक्या स्तरावर आहे परंतु खामगाव येथे या विभागाचे जिल्हा कार्यालय असल्यामुळे याचं कार्यालयात मोठ्या संख्येने कर्मचारी कार्यरत होते ,ती संख्या 51 असल्याचे सांगण्यात आले आहे यापैकी 32 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली असून विशेष म्हणजे प्रशासन व कर्मचारी संघटनेने कुठलाही समारंभ अनेक ठिकाणी आयोजित केला नसला तरीही विविध कर्मचाऱ्यांनी परस्परांचा भाऊक निरोप घेत शेवटच्या दिवसाची सेवा पूर्ण केली. खामगाव कार्यालयातून बत्तीस कर्मचारी स्वेच्छा निवृत्त झाल्याने या कार्यालयात आता एकोणवीस कर्मचारी राहिले आहेत तर जिल्ह्यात हा आकडा 48 कर्मचाऱ्यांचा आहे जिल्ह्यात आजही अनेक ग्राहकांकडे लैंडलाइन टेलिफोन आहेत आणि त्याचा वापरही केल्या जातो अनेक वेळा ते टेलीफोन नादुरुस्त होतात त्यामुळे सेवा सुरळीत करण्यासाठी फिल्डवर कार्य करण्याकरिता जिल्ह्यात केवळ दोनच लाईनमन उरले आहेत. यामध्ये व्ही डी कांबळे व कमरुद्दिन यांचा समावेश आहे ,त्यामुळे दोन लाईनमन आता नादुरुस्त लँडलाईन ची सेवा कशी सुरळीत करणार हे एक त्यांच्यासाठी दिवास्वप्न ठरणार आहे.
previous post