खामगांव : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था खामगाव चे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर सर यांनी येणाऱ्या २०२०/२१ या सत्रात दहावी आणि बारावी मध्ये गुंजकर काँमर्स अँड सायन्स कॉलेज व जिजाऊ स्कुल आँफ स्कालर्स आवारला कॉलेज मधुन प्रथम व द्वितीय येणाऱ्या मुला-मुलींना रोख स्वरूपात रक्कम देण्यात येणार आहे. सदर चेक चिखली तालुक्यातील ग्राम ईसोली येथील कु.दुर्गाबाई तुकाराम खपके यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामकृष्ण गुंजकर यांच्या कडे सुपुर्द केला आहे. कॉलेज मधून प्रथम,द्वितीय येणाऱ्यांना याची रक्कम रोख स्वरूपात दरवर्षी देण्यात येणार आहे.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितीतांचे आभार प्रा.रामकृष्ण गुंजकर सरांनी मानले.यातुन काही रक्कम आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना व अनाथ मुला मुलींना तसेस गोरगरीब मुला मुलींना देऊन या मदतीचा फायदा शिक्षणासाठी होईल असे सुद्धा प्रा. रामकृष्ण गुंजकर यांनी सांगितले आहे.