शेगांव : काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे लागलेल्या आगीने गट नंबर १६४ गव्हाण मधील शिवारातील शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली. आगीमध्ये ठिबक सिंचन प्रणाली,स्प्रिंकलर सेट,शेतीचे साहित्य,औजारे, वखार, मोटार, पाईप असे साहित्य जळून शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. देवेंद्र महादेव मसने रा गव्हाण ता शेगांव जि बुलडाणा. परिसरात अचानक पणे दिनांक २८ मार्च २०२४ रोजी रात्री जोराचा वारा आल्याने आग लागल्याने मसने यांचे शेतीची अवजारे शाईन कंपनीची मोटर पंप,३०० फूट केबल,स्प्रिंकलर सेट,आदी शेती उपयोगी वस्तू चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने या बागेची जोपासना करण्यात आली. बागेमध्ये त्यांनी विविध झाडांची लागवड करून जैवविविधता जोपासलेली होती. सुमारास शेतातून गेलेल्या विद्युतवाहिनीच्या घर्षणामुळे ठिणगी पडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बागेतील वाळलेले गवत पेटले, हवा वाहत असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. काही वेळातच आगीमध्ये केळी व इतर पिकासह त्यातील ठिबक सिंचन प्रणाली, शेतीचे साहित्य, औजारे, वखार, मोटार, पाईप असे साहित्य जळून खाक झाले.झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने करून द्यावी, अशी मसने यांनी मागणी केली आहे.वृत्त लिहे पर्यंत आग कश्यामुळे लागली समजले नाही.
खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख शेगांव शेतकरी संग्रामपूर