संगणक परिचालक बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने राज्याध्यक्ष व मुख्यमंत्री यांचे मानले आभार…
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना (AWB/3466) संघटना स्थापन झाल्यापासून लढा सुरू आहे. आणि संघटनेच्या लढ्याला यश आज आले आहे.त्यामध्ये मुंबईचे दहा दिवसाचे उपोषण असेल,नागपूर येथील चार दिवसाचे उपोषण असेल,आणि सातारा येथील १८ दिवस संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष सुनीताताई आमटे यांनी केलेले उपोषण केले होते, आणि तीन दिवसांपूर्वी बांधकाम भवन मुंबई येथे सुनिताताई आमटे व सहकारी यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करू असा इशारा देऊन शासनाला जाग आणून दिली, शासनाला निर्णय देण्यास भाग पाडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दखल घेऊन आज तीन हजार रुपये मानधन वाढ करून निर्णय दिला आहे. मुख्यमंत्री साहेबांचे राज्य संघटना व बुलडाणा जिल्हा
संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शुभम लांडे यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त केले.