जिल्ह्यात ११ ऑगस्टपर्यंत अतिसार नियंत्रण कार्यक्रम
बुलढाणा : पावसाळ्यात पाच वर्षांखालील बालकांना अतिसार या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारापासून बालकांचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्ह्यात घरोघरी ओआरएस पाकीट आणि झिंक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १ जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत अतिसार नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा सुकाणू समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली.जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या सभेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, कृष्ठरोग सहायक संचालक डॉ. हरीष पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, महिला-बाल कल्याण अधिकारी येंडोले आदी उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल राम गिते यांनी, पाच वर्षांखालील साठ्याची उपलब्धता, आवश्यक जिल्ह्यातील बालकांना अतिसार, मनुष्यबळ आणि कार्यक्रम जुलाब आजारापासून सुरक्षित राबविण्याबाबत करण्यासाठी ओआरएस पावडरचे माहिती दिली. पाकीट आणि अतिसाराने आजारी असलेल्या बालकांना झिंकच्या गोळ्यांचे आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम राबविण्याबाबत नियोजन, ओआरएस पावडर पाकीट, तसेच झिंक गोळ्यांच्या नियोजनाची अतिसार नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्वेक्षण करून बालकांच्या पालकांपर्यंत ओआरएस पाकीट आणि झिंक गोळ्यांचे वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यावेळी दिल्या.