खामगाव- वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने आज मानवाला ग्लोबल वार्मिंग सारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे. या संकल्पनेनुसार अनिकट रोड येथील परनिल सचिन मुंढे या 7 वर्षीय चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त मुंढे परिवाराने वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देत सुमारे 450 विविध रोपांचे वाटप केले.चिरंजीव परनिल सचिन मुंढे याचा सातवा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना सुमारे 300 रोपांचे वाटप करण्यात आले. तर मागील बऱ्याच वर्षापासून जनुना तलाव परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविणाऱ्या शिवशंभो ग्रुपचे सदस्य एन. वाय. देशमुख व महेशभाऊ गावंडे यांना 150 झाडांचे रोप देण्यात आले. सचिन मुंढे सर यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत असून प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला असा उपक्रम राबवाबा अशी प्रेरणा इतरांना नक्कीच मिळणार आहे.