October 10, 2024
अमरावती खामगाव गुन्हेगारी चिखली जळगांव जामोद जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई मेहकर विदर्भ शेगांव संग्रामपूर

पत्रकार संजय वर्मा यांच्यावरील खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा खामगाव शहरातील पत्रकार बांधवांची मागणी राज्‍यपाल, निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन

खामगाव : १०६ मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या वरिष्ठ नागरीकांना मतदान करण्यासाठी मदत केल्यामुळे मदतकर्त्या पत्रकाराला मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तात्काळ या प्रकरणी चौकशी कमिटी नेमुन घटनेची चौकशी करावी व संजय वर्मा यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी खामगावातील पत्रकार बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज दि. २९ एप्रिल राेजी उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्‍वर पुरी यांच्या मार्फत राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये नमुद आहे की, पत्रकार संजय वर्मा यांच्या शेजारचे वयोवृध्द डॉ. सुधाकर तांबट, वय ८० व सौ. अलका तांबट ह मतदानासाठी पायी जात असतांना त्यांना संजय वर्मा यांनी चारचाकी वाहनाने मतदानासाठी पाठविले व मागन संजय वर्मा हे स्वतः मतदानासाठी गेले. येथे मतदान करण्यासाठी संजय वर्मा यांच्या अगोदर गेलेले डॉ. तांबट है. परत पायी येत असतांना त्यांना दिसले. संजय वर्मा यांनी त्यांची गाडी डॉ. तांबट यांना घेण्यासाठी मतदान केंद्र परिसरात बोलाविली असता पवन रतन शेगोकार नामक होमगार्ड ने गाडी आतमध्ये घेण्यास मज्जाव केला संजय वर्मा यांनी पवन शेगोकार यांना विनंती केली असता शेगोकार यांनी संजय वर्मा यांचेसोबत वाद घातम्या त्यानंतर वर्मा यांनी ड्रायव्हरला सांगुन वयोवृध्द मतदारांना घरी रवाना केले. संजय वर्मा या घटनेनंतर आतमध्ये मतदानासाठी गेलो असता आतमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचारी सुनिता कश्यप मॅडम या आल्या व त्यांनी घडलेल्या घटनेचा जाब विचारला. संजय वर्मा यांनी त्यांना वृत्तांत सांगत असतांनाच त्यांनी कारवाई करण्याची धमकी देत बाहेर निघुन जाण्याचे सांगीतले संजय वर्मा यांनी त्यांना मतदान करण्यासाठी आलो आहे असे सांगितले असतांना सुध्दा त्यांनी संजय वर्मा यांना बाहेर जाण्यास सांगितले. असे करून पोलीस कर्मचारी सुनिता कश्यप यांनी संजय वर्मा यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धाकामुळे ते मतदान न करता निघून येत असतांना पाटे नावाचे पिएसआय तेथे पोहोचले त्यांनी त्यांना घटनेबद्दल विचारले असता त्यांना घटना सांगितली तेव्हा त्यांनी तुम्ही येथे जास्त वेळ थांबू नका अथवा कारवाई करावी लागेल असे सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार संजय वर्मा हे मतदान न करना निघून गेले.त्यानंतर ते परत मतदानासाठी हिम्मत करून जात असतांना तेथे पंकज सातव हे आले, त्यांनी सदर महिला कर्मचाऱ्यास म्हटले की, हा पत्रकार पत्रकार याला घाबरू नका, याला मतदान करू देवु नका मी तुमच्या पाठीशी आहे असे बोलून एक प्रकारे आचार संहितेचा भंग केलेला आहे. यानंतर सदर घटनेची रितसर तक्रार संजय वर्मा यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.रामेश्‍वर पुरी यांच्याकडे दिली. तक्रारीची पोचही घेतली. कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत प्रविण नाचनकर शहर ठाणेदार खामगांव पो.स्टे. यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधुन संजय वर्मा यांना मतदान देण्यासाठी स्वतः संरक्षण द्यावे असे आदेश दिले. त्यानंतर संजय वर्मा हे मतदान केंद्र, जि.प.मुलींची शाळा नांदूरा राड खामगांवच्या बाहेर थांबले, तेथे शहर ठाणेदार हे आले तेथे उपस्थित पत्रकारांनी घटनेची शुटींग करीत होते त्यावेळी त्यांनी आल्याबरोबर पत्रकारांना धमकावत शुटींग न काढण्याचे सांगितले. त्यानंतर संजय वर्मा त्यांच्यासोबत मतदानाला गेले, मतदान करून परत आले. डॉ. रामेश्वर पुरी, सहाय्यक निवडणूक अधिकारी ५ यांनी संजय वर्मा यांची तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकरे यांना चौकशी व कार्यवाहीसाठी पाठविली, ही तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी चौकशी साठी व अहवाल सादर करण्यासाठी शहर ठाणेदार प्रविण नाचणकर यांच्याकडे तातडीने पाठविली. ही तक्रार बघितल्याबरोबर नाचणकर हे चिडले, त्यांनी होमगार्ड पवन रतन शेगोकार याला बोलावुन संजय वर्मा यांच्या विरूध्द फिर्याद द्यायला लावली. त्यानंतर प्रविण नाचणकर यांनी संजय वर्मा यांचेवर गुन्हा नं. २३६ दि.२६ एप्रिल रोजी रात्री १०.३८ वाजता कलम भादवि १८६० कलम ३५३, १८६, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५०, १९५१, १९८९ कलम १३१, १३२ नुसार गुन्हा दाखल केला. एका मतदारावर व जेष्ठ नागरीकांना मतदानासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीवर अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करून निवडणूकीला काळीमा फासला आहे. पोलीस कर्मचारी सुनिता कश्यप यांच्या विरूध्द यापुर्वीही अनेक तक्रारी आलेल्या असुन त्या वादग्रस्त आहेत. अशा या वादग्रस्त कर्मचाऱ्याविरूध्द कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. घटना स्थळी होमगार्ड पेक्षा वरिष्ठ कर्मचारी उपस्थित असतांना त्यांची तक्रार न घेता एका होमगार्डला तक्रार द्यायला लावुन गुन्हे दाखल केले आहे.या घटनेमुळे खामगांव शहरातील मतदारांना धक्का बसला असुन पुढे येणाऱ्या विधानसभा व नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये मतदान टक्केवारीवर याचा परिणाम निश्चीत दिसून येईल. शासन कोट्यावधी रूपये खर्च करून नागरीकांना मतदान करण्याचे आव्हान करते, मात्र अधिकाऱ्यांच्या अशा या वागणुकीमुळे मतदारांवर परिणाम होत आहे. मतदारांना मदत करणारे संजय वर्मा या पत्रकारावर गुन्हे दाखल केले, मात्र घटनास्थळी वाद करणाऱ्या वादग्रस्त कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले नाही व पत्रकाराचा अपमान करणाऱ्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तात्काळ या प्रकरणी चौकशी कमिटी नेमुन घटनेची चौकशी करावी व संजय वर्मा यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना किशोर भोसले, अनिल खाेडके,अमोल गावंडे,किरण मोरे, शरद देशमुख, संजय वर्मा, मो.फारूख, मो.रियाज, राहुल खंडारे, अनुप गवळी, नितेश मानकर, मोहन हिवाळे, विनोद भोकरे, संतोष धुरंधर,अमोल गावंडे, नितीन इंगळे, गजानन सुशिर, आनंद गायगोळ, शिवाजी भोसले, पंकज ताठे, सुधिर टिकार, देवेंद्र ठाकरे, संभाजीराव टाले, विनायक देशमुख,मुकेश हेलोडे, गणेश पानझाडे, सिध्दांत उंबरकार यांच्यासह खामगाव तालुक्यातील असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

Related posts

दुर्मिळ सिंगापूर चेरी वृक्ष खामगावात आढळला

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त १८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

nirbhid swarajya

ज्येष्ठ साहित्यिक मतकरी यांचं कोरोनामुळे निधन

nirbhid swarajya
error: Content is protected !!