February 11, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

दोन ऑटो चालकांमधे शुल्लक कारणावरून वाद ; एकाचा खून

खामगांव : ऑटो मध्ये सवारी बसवण्याच्या कारणावरून दोन चालकांमध्ये वाद होऊन खून झाल्याची घटना आज संध्याकाळी ५:३० वाजताच्या सुमारास निर्मल टर्निंग वर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑटो मध्ये सवारी बसण्याचे कारणावरून दोन ऑटो चालकांमध्ये २ तासापासून वाद सुरु होते. त्या वादाचे रूपांतरण हाणामारीत झाले व मेहरसिंह गोविंदसिंग चव्हाण याने आपल्या जवळ असलेल्या किरपन या धारदार शस्त्राने अजय आवटे याच्या पोटात वार करून जखमी केले. ज्याने वार केले त्यानेच जखमीला येथील सामान्य रुग्णालयात आपल्या ॲटो मध्ये घेऊन आला सामान्य रुग्णालयात आणल्यावर तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता तो मृत्यू झाल्याचे सांगितले अजय आवटे वय ४५ रा. सती फैल असे मृतकाचे नाव असून मेहरसिंह ( पिंचु ) गोविंदसिंग चव्हाण वय ४३ रा. लक्कडगंज असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. ज्याने चाकु मारला त्याने स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशन व शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या प्रमाणात जमाव हा सामान्य रुग्णालयात जमला होता. तसेच निर्मल टर्निग जवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाने याठिकाणी तगडा बंदोबस्त लावला होता.

Related posts

शेलोडी येथे घरफोडी

nirbhid swarajya

गॅस लीकेजमुळे घरात आग; 3 जण गंभीर जखमी

nirbhid swarajya

मार्केटिंग फेडरेशनच्या गोडाऊन मधून तुर लंपास

nirbhid swarajya
error: Content is protected !!