November 15, 2025
अमरावती खामगाव गुन्हेगारी जिल्हा नागपुर नांदुरा पुणे बातम्या बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मुंबई विदर्भ शेगांव

खामगाव ते नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ढाब्यावर उभ्या तीन ट्रकच्या टाकीतून ४२५ डिझेल लंपास…

शेगांव : तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खामगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आमसरी शिवारात केसरी धाब्यासमोर उभ्या असलेल्या तीन ट्रक मधील डिझेलच्या टॉकीचे लॉक तोडून टाकीतील ३८ हजार ६०५ रुपयांचे डिझेल अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याची घटना मध्यरात्री घडली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव ते नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या आमसरी शिवारातील केसरी धाब्यासमोर उभे असलेले ट्रक क्रमांक एमएच १८ बी झेड ३६३६ या ट्रकच्या डिझेल टाकीमधून २००लिटर डिझेल किंमत १८ हजार २०० रुपये, ट्रक क्रमांक जी जे ०६ ए झेड ५२१७ मधून ७० लिटर डिझेल किंमत ६ हजार ३००, ट्रक क्रमांक डीडी ०१ एस ९१४५ मधून १५५ लिटर डिझेल किंमत १४ हजार १०५ रुपये असा एकूण तीनही ट्रक मधील ३८ हजार ६०५ रुपयाचे अज्ञात चोरट्याने डिझेल टाकीचे लॉक तोडून डिझेल लंपास केले आहे. याबाबतची तक्रार प्रभाकर रमेश बागूल रा. पासर्डी ता भडगाव जि. जळगाव खान्देश याने जलंब पोलीस स्टेशनला दिली यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अप नं ९८/२०२४. कलम ३७९ अन्वे गुन्हा दाखल केला पुढील तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार दिनकर तिडके हे करित आहे.

Related posts

बुलढाणा येथील माजी आमदार विजयराज शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश

nirbhid swarajya

जिल्हयात आज प्राप्त २१ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 398 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 167 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!