आ.आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते
खामगाव – विधानसभा मतदार संघातील शहर व ग्रामीण भागात आमदार आकाश फुंडकर यांचा विविध विकास कामांचा झंझावात सुरू आहे. महात्मा गांधी उद्यान येथे उद्या बुधवार 13 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता आभासी पध्दतीने शहरातील एकुण मुख्य 22 कॉक्रीट रस्ता कामांचे भूमिपूजन आ. आकाश फुंडकर यांचे हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा सोशल मिडियाचे संयोजक सागर फुंडकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.भूमिपूजन करण्यात येत असलेल्या शहरातील रस्ता कामामध्ये अनिल भदाडे ते जलंब रोड रस्ता, विश्व हिंदु परिषद कार्यालय ते पंकज देशमुख ते मोकळी जागा ते जलंब रोड, जलंब रोड ते मुळे इलेक्ट्रीकल्स ते सिल्व्हर सिटी व वडोदे यांचे घरापासून ते ओंकार आप्पा तोंडकर ते जलंब रोड, जलंब नाका एकता कॉम्पलेक्स ते फ्रेन्ड अपार्टमेंट ते सातव पॉईंट, नांदुरा रोडवरील पुनम मेडीकल ते चोपडा यांचे घरापर्यंत रस्ता, हॉटेल विशालपासुन ते रेल्वे गेट ते क्रिडा संकुल पर्यंतचा रस्ता, शेगांव रोड ते सरकारी गोडाऊन ते श्री गजानन कॉलनी ॲाटो स्टॉप, शेगांव रोड नाका ते डी.पी. ते नखाते सर यांचे घर, श्री सप्तश्रृंगी मंदीर तँ कुरळकर ते सकळकळे, श्री शुक्ला ते चिंतामणी मंदीर ते घाटपुरी नाका रस्ता, जगदंबा चौक ते पोलीस स्टेशन व महात्मा गांधी पुतळा ते राष्ट्रीय महामार्ग, विकमसी चौक ते चांदमारी चौक, श्री तेजपाल नवलचंद ते कमलसिंग गौतम चौक, बहावलपुरी कॅम्प येथील जनुना चौफुल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते भारत कटपीस, अशोक गेस्ट हाऊस ते अग्रसेन चौक ते एकबोटे चौक ते सनी पॅलेस, कमलसिंग गौतम चौक ते भुसावळ चौक, भुसावळ चौक ते महाविर चौक, फरशी ते सराफा पोष्ट ऑफीस ते सावरकर चौक, काळे किराणा ते घाटपुरी नाका ते बायपास, राणा गेट ते डॉ. वराडे ते अमडापुर नाका (टिळक राष्ट्रीय विद्यालया समोर), टॉवर चौक ते श्रध्दा ज्वेलर्स, शिवाजी वेस दंडे स्वामी मंदीर ते घाटपुरी नाका रस्ता कामाचा समावेश आहे.