बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 71 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 68 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे पारपेट, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष व 6 वर्षीय मुलीचा आहे. तसेच धामणगाव बढे ता. मोताळा येथील 30 वर्षीय पुरुष रुग्णाचा आहे. सदर 30 वर्षीय पुरुष रूग्ण 19 जुन रोजी मृत पावला असून या रुग्णाचा तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे आज 14 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार त्यांना आज सुट्टी देण्यात आली. यामध्ये शेगाव कोविड रुग्णालयातून पातुर्डा ता. संग्रामपुर येथील 58 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा, 46 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 44 वर्षीय महिला व 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. तसेच धरणगाव ता. मलकापुर येथील 70 वर्षीय वृद्ध महिला, बहापुरा ता. मलकापुर येथील 24 वर्षीय महिला, विठ्ठल चौक संग्रामपूर येथील 24 वर्षीय पुरुष, ब्राम्हण चिकना ता. लोणार येथील 25 वर्षीय महिला व 30 वर्षीय पुरुष, भुमराळा ता. लोणार येथील 40 वर्षीय महिला रूग्ण आहेत. तसेच आतापर्यंत 2117 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 151 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी सहा मृत आहे. आतापर्यंत 109 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 109 आहे. सध्या रूग्णालयात 36 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत तसेच आज 20 जुन रोजी 71 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 03 पॉझीटीव्ह, तर 68 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 91 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2117 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
previous post
next post