November 20, 2025
संग्रामपूर

पंचायत समिती कर्मचाऱ्याच्या चार चाकी वाहनाचा अपघात

 संग्रामपूर : येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या वाहनाला १ ९ जून रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पातुर्डा – खोरोङ्यादरम्यान वरवट बकाल – शेगाव रस्त्यावर अपघात होऊन त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत . जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव सोळंकी असून ,ते संग्रामपूर पंचायत समितीमध्ये लेखाधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . आपल्या वाहनाने ते वरवट बकाल वरून शेगावकडे जात असतांना. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे व वाहनाचेही यात मोठे नुकसान झाले आहे . सुदैवाने याच मार्गाने संग्रामपूर येथील आरोग्य विभागात असलेले डॉ . संजय महाजन हे जात असताना त्यांना अपघातग्रस्त वाहन दिसले . त्यामुळे त्यांनी तत्काळ अपघातस्थळाकडे धाव घेतली व वाहनाची काच फोडून सोळंकी यांना वाहनातून बाहेर काढले . सध्या सोळंकी यांना शेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.

Related posts

रेल्वे मार्गासाठी स्वाभीमानीचे आंदोलन

nirbhid swarajya

किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे ! प्रतिमा पायदळी तुडविली;ठाकरे गट आक्रमक

nirbhid swarajya

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील इको सायन्स पार्कमध्ये आग

nirbhid swarajya
error: Content is protected !!