खामगांव : नगर परिषदेकडून शहरात आगळावेगळा प्रयोग राबवून शहरातील पोलीस स्टेशनच्या, गांधी बगीचासह शहरातील विविध भागातील ओसाड भिंतींवर सामाजिक व कोरोना बाबत संदेश देत चित्रे रेखाटण्याचे काम सुरु आहे.वाहने चालवण्याबाबत तसेच पर्यावरणाचे रक्षण करा, पाण्याचे मोल अनमोल, वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धनाची गरज असा सामाजिक संदेश देत समाजप्रबोधन केले जात आहे. तसेच कोरोनाबाबत संदेश देत आगळावेगळा प्रयोग
शहरातील पोलीस स्टेशन व गांधी बगीचाच्या ओसाड भिंती बोलक्या करीत आगळावेगळा प्रयोग राबविल्याने कौतुक होत आहे. मंगळवारी सकाळपासून आकर्षक चित्र रेखाटण्याचे काम सुरु होते. दुपार पर्यंत सर्व भिंती आकर्षक दिसत होत्या. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागिरकांचे लक्ष वेधल्या जात आहे. त्यामुळे शहरातील बोलक्या भिंती आकर्षण ठरत आहेत.