April 19, 2025
गुन्हेगारी बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

शेगाव नगरपालिकेवर दगडफेक ; कर्मचाऱ्यांनी थांबवले कामकाज

शेगाव: येथील नगर परिषद प्रवेशद्वारावर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमांनी तोडफोड करुन दगडफेक केली. सकाळी अचानक इमारतीच्या आत प्रवेश करून शिवीगाळ करुन दगडफेक केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी दुपारी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.यावेळी नगर परिषद कर्मचारी यांनी शहर पोलिसात निवेदनात दिलेल्या नमूद आहे की, झालेल्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमधे भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ या हल्लेखोराना अटक करुन कारवाईची मागणी केली आहे.

Related posts

कोरोना लसीकरणाच्या जनजागृती साठी शिक्षक झाले नवनाथ

nirbhid swarajya

निशिकांत कामत यांचे निधन

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 255 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 88 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!