खामगांव : खामगांव विधानसभा मतदार संघाचा विकास करतांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केल्या गेला नाही. सर्व समावेशक व शाश्व़त विकास करण्यात आला आहे व हयापुढेही करण्यात येईल. खामगांव मतदार संघातील मौजे कोलोरी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत रु 55.48 लक्ष निधीच्या बंधाऱ्याचा भुमिपूजन, आ.स्थानिक विकास निधी मधून सभागृह बांधकाम, जनसुविधेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे रु 4 लक्ष तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे रु.5 लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या समाजमंदीराचे लोकार्पण करण्यात आले हयावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर बोलत होते. राज्यात भाजपाचे सरकार तरीही हया खामगांव मतदार संघाचा आमदार तुमचा आहे. आम्ही स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालमीत घडलो आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात व आशीर्वादाने ही विकासाची वाटचाल सुरू आहे. मतदार संघात जवळपास 2200 कोटी रुपयांची कामे करण्यात आली. हयामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात आला नाही. कारण विकास कामांचा उपयोग सर्वांना होतो. रस्ते, नाली, बंधारे हे सर्वांच्या विकासाला हातभार लावतात. मतदार संघातील सिंचनाच्या कामांमुळे हजारो शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत झपाटयाने सुधारतांना दिसत आहे. त्यात सर्वच पक्षाचे शेतकरी आहेत.आज माझ्या मतदार संघातील शेतकरी हा फळबाग व बागायती पिक घेण्याचे धाडस करतो आहे.त्यामुळे आज नगदी पिक त्यांना मिळत असून शेती मध्ये नवनवीन प्रयोग व पिक शेतकरी घेऊ लागला आहे. त्यामुळे गांवाच्या विकासांमध्ये बंधारे व नदी नाले खोलीकरणाचे अत्यंत महत्व़ आहे. हया बंधा-यांची काळजी शेतकऱ्यांनी देखील घेणे आवश्य़क आहे. शासनाने आपणास बंधारे बांधून दिले आहेत.खोलीकरण करुन दिले आहे. त्याची साफ सफाई ठेवणे हे त्या बंधाऱ्याच्या बांधावरील व परिसरातील शेतक-यांनी स्व़त:ची जबाबदारी समजून व स्व़त:ची मालमत्ता समजून करावी असेही आ.आकाश फुंडकर म्हणाले. कोलोरीचा तसेच मतदार संघातील प्रत्येक गावांचा विकास असाच सुरू ठेऊ.भाजपाच्या महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणी मध्ये कोलोरीच्या सरपंच सौ.सुमनबाई टिकार यांची निवड झाल्याबद्दल आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या भुमिपूजन व लोकार्पण सोहळयाप्रसंगी प्रमुख उपस्थिती. सरपंच सौ.सुमनबाई टिकार, सुरेश गव्हाळ, उर्मिलाताई गायकी, प.स.सभापती सौ.रेखाताई मोरे, उपसभापती सौ.शितलताई मुंढे, जि.प.सदस्या सौ.जयश्रीताई टिकार, माजी युवा मोर्चा ता.अध्यक्ष, विनोद टिकार, प.स.सदस्य श्री.राजेश तेलंग, गजानन टिकार, चेतन फुंडकर, शे.समद, गजानन धोत्रे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ता श्री.सारंगधर कोरडे, यांच्यासह गावातील गावकरी मंडळी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.